साकारते रूप गणेशाचे !

By Admin | Updated: July 5, 2014 03:39 IST2014-07-05T03:39:26+5:302014-07-05T03:39:26+5:30

गणेशोत्सव अवघ्या तीन महिन्यांवर ठेपल्याने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांची लगबग सुरू झाली आहे

Ganesha as a genius! | साकारते रूप गणेशाचे !

साकारते रूप गणेशाचे !

अमर म्हात्रे, नायगाव
गणेशोत्सव अवघ्या तीन महिन्यांवर ठेपल्याने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कलाकारांची लगबग सुरू झाली आहे. वाढलेले सामानांचे दर, मजुरी, विजेचा लपंडाव, मजुरांची कमतरता अशा अनेक समस्यांशी लढत वसईतील अनेक कुटुंबे आपला पिढीजात व्यवसाय पुढे चालवत आहेत.
आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या गणेशाचे आगमन होणार आहे. त्यासाठी भक्तांची लगबग लवकरच सुरू होईल, मात्र त्या अगोदर खरी मेहनत सुरु होते ती गणेश मूर्तीकारांची. आतापासूनच कारागीर कामाला लागले असून काही कार्यशाळात गणेशमूर्ती तयारही झाल्या आहेत. शाडूच्या व प्लॅस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तींना वाढती मागणी असल्याने वसईतील मूर्ती मुंबईतही नेल्या जातात, तर सफाळे, केळवे भागातही या मूर्ती नेल्या जातात.
अल्पावधीत त्या तयार करणे आवश्यक असल्याने सध्या गणपती कारखाने आहोरात्र सुरू आहेत. त्यातच केवळ हंगामी मूर्तीकार गल्लीबोळात आल्याने अशा व्यवसायाला घरघर लागली. मजुरांचा तुटवडा ही त्यातील सर्वात मोठी समस्या आहे. वसई, आगाशी, पापडी येथील मागील अनेक पिढ्यांचा हा व्यवसाय अजूनही सुरू आहे. जुलै महिना लागताच या कामांची लगबग सुरू होते.

Web Title: Ganesha as a genius!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.