गणेश मंडळांना मिळणार सवलतीच्या दरात वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 01:10 AM2019-08-22T01:10:38+5:302019-08-22T01:10:46+5:30

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन (व्हिलिंग) आकार असे वीजदर आहेत.

 Ganesh boards will get electricity at a discounted rate | गणेश मंडळांना मिळणार सवलतीच्या दरात वीज

गणेश मंडळांना मिळणार सवलतीच्या दरात वीज

googlenewsNext

मुंबई : महावितरणकडून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना ४ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट वीजदराने तात्पुरती वीजजोडणी देण्यात येत आहे. परिणामी, मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन (व्हिलिंग) आकार असे वीजदर आहेत. परिणामी, अधिक वीज वापरली, तरीही शेवटच्या युनिटपर्यंत केवळ ४ रुपये ५५ पैसे प्रतीयुनिट एवढाच दर आकारण्यात येईल. मंडळांना प्राधान्याने वीजजोडणीसाठी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वीजभार ०.५ किव्होकरिता एक हजार रुपये वीजजोडणी खर्च आकारण्यात येईल. मंडळाच्या वीजभारानुसार सुरक्षा ठेव रक्कम आकारण्यात येईल. उत्सव संपल्यानंतर ही रक्कम मंडळाच्या खात्यात महावितरणकडून आॅनलाइनद्वारे परतावा करण्यात येईल.

वीजयंत्रणेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन
मंडळाने सुरक्षिततेच्या जबाबदारीबाबत स्वत:चे प्रमाणपत्र (सेल्फ सर्टिफिकेशन), बँक खात्याची माहिती, मोबाइल क्रमांक देणे गरजेचे आहे. वीजजोडणी,
तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता आहे. पावसामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. महावितरणचे अभियंता यांचे मोबाइल क्रमांक नोंदवून ठेवावेत. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत, तसेच गणेश मंडपातील वीजयंत्रणेची दैनंदिन तपासणी करावी, असे आवाहनदेखील महावितरणने
केले आहे.

Web Title:  Ganesh boards will get electricity at a discounted rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई