गणोशोत्सव काळात खेळला जातोय द्यूत

By Admin | Updated: September 5, 2014 23:23 IST2014-09-05T23:23:55+5:302014-09-05T23:23:55+5:30

गणोशोत्सवाच्या दिवसात शिरवली गावात प्राचीन काळातील द्यूत खेळ खेळला जातो. महाभारतात या खेळात पांडवांनी द्रोपदीलाही पणाला लावले होते.

Gaming is being played during Ganeshotsav period | गणोशोत्सव काळात खेळला जातोय द्यूत

गणोशोत्सव काळात खेळला जातोय द्यूत

पारोळ :  गणोशोत्सवाच्या दिवसात शिरवली गावात प्राचीन काळातील द्यूत खेळ खेळला जातो. महाभारतात या खेळात पांडवांनी द्रोपदीलाही  पणाला लावले होते. हाच द्यूत खेळ 75 वर्षापासून खेळण्याची परंपरा कायम आहे.
गणोशोत्सवात रात्र जागवण्यासाठी पत्ते खेळणो, भजन करणो, पारंपारीक पद्धतीने गौरी नाच करणो अशा विविध प्रकारे जागरण केले जाते. 194क् साली मोकाशी परिवारात गौरीची स्थापना केली. त्या वर्षापासून हा खेळ खेळला जातो.
सोंगटय़ा, कवडय़ा व सारीपाट याचा उपयोग करून हा खेळ खेळला जातो. दोन संघामध्ये होणारा हा खेळ असून या खेळात विजय संपादन करण्यासाठी खेळाडूना बुद्धीचा कस लावावा लागतो. विशेष म्हणजे या खेळात कोणत्याही प्रकारे पैशाचा उपयोग होत नाही. आज घडीला वसई परिसरात कुठेही हा खेळ खेळला जात नाही. या खेळाचा एक डाव पुरा होण्यासाठी चार ते पाच तास लागतात. आता गणोशोत्सवात पत्त्यांच्या खेळामुळे तरूण पिढी या खेळाकडे पाठ फिरवताना दिसत आहे. तसेच या काळात या दुत खेळाचे साहित्यही मिळत नसल्याचे दुत (पट) खेळाचे जाणकार रमाकांत मोकाशी यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)
 

 

Web Title: Gaming is being played during Ganeshotsav period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.