गाेरेगावमध्ये जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:06 IST2021-04-02T04:06:08+5:302021-04-02T04:06:08+5:30

मुंबई : गोरेगाव पश्चिमेकडील भगतसिंग परिसरात सुरू असलेला जुगाराचा अड्डा गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला. बुधवारी गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ...

Gambling den demolished in Garegaon | गाेरेगावमध्ये जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त

गाेरेगावमध्ये जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त

मुंबई : गोरेगाव पश्चिमेकडील भगतसिंग परिसरात सुरू असलेला जुगाराचा अड्डा गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला. बुधवारी गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने ही कारवाई केली असून यात मालक, ७ ग्राहकांसह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना पुढील चौकशीसाठी बांगूर नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

..................................

मध्यस्थी करणे पडले महागात

मुंबई : मालाड पूर्वेकडील कुरारगाव परिसरात २९ मार्च रोजी संध्याकाळी साडेसात वाजता विजय बनसोडे (२७) यांचा भाऊ रोहित याच्याशी दुचाकी पाडण्याच्या रागातून आरोपीने वाद घातला. विजय हे त्याला समजाविण्यासाठी मध्ये पडताच त्यांच्या डोक्यात आराेपीने लोखंडी कोयत्याने वार करत त्यांना जखमी केले. याप्रकरणी कुरार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला.

..........................................

गुंतवणूकदारांची पावणेदोन कोटींची फसवणूक

मुंबई : गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून पावणे दाेन काेटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका क्रेडिट को. ऑप. सोसायटीच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुंतवणूकदारांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत.

............................

Web Title: Gambling den demolished in Garegaon