जुगार अड्ड्यावर धाड

By Admin | Updated: June 7, 2015 00:09 IST2015-06-07T00:09:30+5:302015-06-07T00:09:30+5:30

शहरातील जुगार अड्ड्यांवरील धाडसत्र सुरूच आहे. शनिवारी एपीएमसीजवळील अड्ड्यावर धाड टाकून जुगार खेळणाऱ्या १५ जणांना अटक केली

Gambling | जुगार अड्ड्यावर धाड

जुगार अड्ड्यावर धाड

नवी मुंबई : शहरातील जुगार अड्ड्यांवरील धाडसत्र सुरूच आहे. शनिवारी एपीएमसीजवळील अड्ड्यावर धाड टाकून जुगार खेळणाऱ्या १५ जणांना अटक केली असून ३१,९१५ रुपये रोकड जप्त केली आहे.
नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृतपणे जुगार अड्डे चालविले जात आहेत. पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांनी या अड्ड्यांविरोधात धडक कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. एपीएमसी सेक्टर १९ मधील नित्यानंद हॉटेलच्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर सतीश मोरे हा जुगार अड्डा चालवत होता. पोलिसांनी या अड्ड्यावर छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या १५ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी सापडलेली रोकड व इतर साहित्य जप्त केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.