शिक्षा करणारी शिक्षिका गजाआड
By Admin | Updated: August 6, 2014 02:43 IST2014-08-06T02:43:22+5:302014-08-06T02:43:22+5:30
आजाराची माहिती असूनही सातवीतल्या विद्याथ्र्याला उठाबशा काढण्याची शिक्षा देणा:या खासगी क्लासच्या शिक्षिकेला कांजूर मार्ग पोलिसांनी अटक केली.

शिक्षा करणारी शिक्षिका गजाआड
मुंबई : आजाराची माहिती असूनही सातवीतल्या विद्याथ्र्याला उठाबशा काढण्याची शिक्षा देणा:या खासगी क्लासच्या शिक्षिकेला कांजूर मार्ग पोलिसांनी अटक केली. गेल्या आठवडय़ात ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पद्मेश जयंत पवार असे विद्याथ्र्याचे नाव असून तो शिवाई विद्यामंदिर शाळेत सातव्या इयत्तेत शिकतो. पद्मेश आपल्या पालकांसोबत भांडुप गावातल्या o्रीकृष्ण नगर परिसरात राहतो. त्याचे वडील टॅक्सी चालक आहेत. पद्मेश याच परिसरातील मंदार क्लासेस या खासगी शिकवणीला जात असे. 23 जुलैला तो नेहमीप्रमाणो शिकवणीला गेला. मात्र दिलेला गृहपाठ न केल्याने खासगी शिक्षिका वनिता चव्हाण यांनी पद्मेशला शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. यानंतर पद्मेश आजारी पडला. त्याची प्रकृती खालावली आणि त्याला उपचारांसाठी डॉक्टरांकडे न्यावे लागले. मुळात पद्मेशला हरणिया आणि दम्याचा त्रस आहे. याची पूर्वकल्पना शिक्षिका चव्हाण यांना दिली होती, असा दावा चव्हाण कुटुंबियांनी जबाबात केला आहे.
दरम्यान, शिक्षेनंतर दोन दिवस पद्मेशने घडला प्रकार घरी सांगितला नव्हता. जेव्हा त्याला डॉक्टरांकडे नेले जात होते तेव्हा त्याने आपल्या आईला शिक्षेबद्दल सांगितले. त्यानंतर पवार दाम्पत्य मंदार क्लासमध्ये गेले. त्यांनी शिक्षिका वनिता यांना जाब विचारला. तेव्हा वनिता व त्यांचा मुलगा मंदार यांनी उलट पवार दाम्पत्यालाच अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतर पवार दाम्पत्य थेट कांजूर पोलीस ठाण्यात धडकले. (प्रतिनिधी)