मतदारांच्या हाती ८८ उमेदवारांचे भवितव्य
By Admin | Updated: October 14, 2014 22:40 IST2014-10-14T22:40:55+5:302014-10-14T22:40:55+5:30
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत मतदान पार पडणार आहे. सातही विधानसभेतील एकूण ८८ उमेदवारांचे भवितव्य १९ लाख ८८ हजार ५०१ मतदारांच्या हाताच्या एका बोटावर अवलंबून आहे.

मतदारांच्या हाती ८८ उमेदवारांचे भवितव्य
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत मतदान पार पडणार आहे. सातही विधानसभेतील एकूण ८८ उमेदवारांचे भवितव्य १९ लाख ८८ हजार ५०१ मतदारांच्या हाताच्या एका बोटावर अवलंबून आहे.
भाजपाचे प्रशांत ठाकूर, शेकापचे विवेक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड, काँग्रेसचे माजी मंत्री रवींद्र पाटील, शेकापचे धैर्यशील पाटील, काँग्रेसचे मधुकर ठाकूर, शेकापचे सुभाष तथा पंडित पाटील, काँग्रेसचे माणिक जगताप, शिवसेनेचे भरत गोगावले यासह अन्य दिग्गजांचे नशीब मतदान यंत्रात बंद होणार आहे.
सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मतदान सुस्थितीत, शांततेत आणि निभर्यपूर्ण वातावरणात पार पडावे यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
प्रचार कालावधीमध्ये बऱ्याच स्टार प्रचारकांनी जिल्ह्यात हजेरी लावली. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी बऱ्याच क्लृप्त्या, आश्वासने उमेदवारांनी दिली होती. आता प्रत्यक्ष मतदानाचा दिवस येऊन ठेपला आहे. त्यामुळे उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हातात आले आहे. पनवेल मतदार संघात १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे उरण-२२, कर्जत- ८,पेण-११ , अलिबाग-१५, महाड-८, श्रीवर्धन-१० अशा एकूण ८८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.