पूर्ण बुकिंग देणा:यांच्या दारी जाणार एसटी !
By Admin | Updated: August 24, 2014 02:05 IST2014-08-24T02:05:09+5:302014-08-24T02:05:09+5:30
गणोशोत्सवासाठी कोकणात जाणा:या चाकरमान्यांसाठी एसटीच्या ठाणो विभागाने मोठय़ा प्रमाणात बस उपलब्ध करून दिल्या आहेत.
पूर्ण बुकिंग देणा:यांच्या दारी जाणार एसटी !
ठाणो : गणोशोत्सवासाठी कोकणात जाणा:या चाकरमान्यांसाठी एसटीच्या ठाणो विभागाने मोठय़ा प्रमाणात बस उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय आवश्यकता भासल्यास बसची पूर्ण बुकिंग करणा:या प्रवाशांच्या दारी बस पाठवण्याचे नियोजन असल्याचे विभागीय अधिकारीअविनाश पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोकणात जाणा:या गणोश भक्तांसाठी याआधीच 741 बस बुक करण्यात आल्या आहेत. यानंतर आता पुन्हा 2क् बसचे बुकिंग झालेले आहे. बोरीवली परिसरातील गणोशभक्तांकडून हे बुकिंग करण्यात आले आहे. यामुळे गणपतीसाठी आता 761 बसेस कोकणात सोडाव्या लागणार आहेत. याशिवाय बसची गरज भासल्यास संबंधितांनी त्वरित संपर्क साधणो आवश्यक आहे. फुल्ल बुकिंग करणा:या संबंधित प्रवाशांच्या परिसरात बस जाऊन प्रवाशांना घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कोकणातील चिपळूण, सावंतवाडी, मालवण, देवगड, लिसंगी, देवळे, अंजर्ले, जैतापूर, गणपतीपुळे, कणकवली, वेंगुर्ला, साखरपा, कासे, म्हसुरे, दापोली, बागमांडला, राजापूर, वैभववाडी, कुडाळ, नारे, विजयदुर्ग, अलिबाग, नरवन, आंबोली, दिवे आगार, वीर बंदर, शिवथरघळ, खेड, मुरूड, जंजिरा, दाभोळ, जयगड, फोंडा, o्रीवर्धन आणि तळवली आदी प्रमुख ठिकाणाहून या बसेस धावणार आहेत. (प्रतिनिधी)