फरार आरोपी आत्महत्या करण्याची पोलिसांना भीती

By Admin | Updated: December 20, 2015 03:01 IST2015-12-20T03:01:57+5:302015-12-20T03:01:57+5:30

कांदिवली येथे झालेल्या हेमा उपाध्याय व हरीश भांबानी यांच्या दुहेरी खून प्रकरणातील प्रमुख फरार आरोपी विद्याधर राजभर आत्महत्या करण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

Fugitive accused police fear to commit suicide | फरार आरोपी आत्महत्या करण्याची पोलिसांना भीती

फरार आरोपी आत्महत्या करण्याची पोलिसांना भीती

- डिप्पी वांकाणी,  मुंबई
कांदिवली येथे झालेल्या हेमा उपाध्याय व हरीश भांबानी यांच्या दुहेरी खून प्रकरणातील प्रमुख फरार आरोपी विद्याधर राजभर आत्महत्या करण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात तळ ठोकून असलेल्या गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांना या दृष्टीने दावे न झालेल्या अपघाती मृत्यूकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
ही घटना उघडकीस आल्यापासून विद्याधरने त्याच्या एकाही परिचिताशी संपर्क साधलेला नाही, त्यामुळेच तो आत्महत्या करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे या सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस चिंतनवर गुन्हा नोंदवीत नाहीत, त्यामुळे हा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करावा, अशी मागणी हेमा उपाध्यायच्या कुटुंबीयांनी यापूर्वी केली होती; मात्र शुक्रवारी त्यांनी घूमजाव करीत पोलीस तपास समाधानकारक असल्याचे सांगितले.
आता युरोप आणि अमेरिका येथील कलावंत या केसबद्दल विचारणा करीत असून, त्यांचे एक प्रकारचे चिंतनला समर्थन आहे.
गुन्हा अन्वेषण खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, फरार झाल्यापासून विद्याधरने त्याच्या कुटुंबीयांशी किंवा परिचितांशी संपर्क साधलेला नाही. आमचे कर्मचारी त्याच्या मूळ गावी आणि अन्य काही ठिकाणी तळ ठोकून आहेत. १२ डिसेंबरपासून झालेले अपघाती मृत्यू आणि त्यातही दावा न झालेल्या अपघाती मृत्यूंबाबत संपूर्ण माहिती घेण्यास आम्ही सांगितले आहे. चिंतन उपाध्याय याने शुक्रवारचा संपूर्ण दिवस कांदिवलीतील गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यालयात घालविला. दीपक प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी कुटुंबाने केली असल्याचे पूर्वी सांगितले होते; पण शुक्रवारी त्यांनी वेगळे वळण घेतले. ते म्हणाले की, आमचा अजूनही चिंतनवर संशय असून, तसे आम्ही पोलिसांना सांगितले आहे. पोलीस तपासावर आम्ही समाधानी आहोत.

Web Title: Fugitive accused police fear to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.