Join us

सलग 13व्या दिवशी इंधन कपात, पेट्रोल 20 पैसे, डिझेल 8 पैशांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 07:46 IST

सलग 13 दिवशी इंधनाच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटर 20 पैशांनी, तर डिझेल प्रतिलिटर 8 पैशांनी स्वस्त झालं आहे.

मुंबई- सलग 13 दिवशी इंधनाच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटर 20 पैशांनी, तर डिझेल प्रतिलिटर 8 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा प्रतिलिटर दर 85.04 , तर डिझेलचा प्रतिलिटर दर 77.32 रुपये झाला आहे. तर नवी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 20 पैसे आणि डिझेलच्या दरात 7 पैशांची कपात झाली आहे. नव्या दरानुसार दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 79.55 रुपये, तर डिझेल प्रतिलिटर 73.78 रुपयांनी मिळणार आहे. पेट्रोलप्रमाणेच डिझेलच्या दरातही 17 ऑक्टोबरला कोणताही बदल झाला नव्हता. मात्र त्यानंतर डिझेलच्या दरात सतत घट होत आहे.गेल्या काही दिवसांचा अपवाद सोडल्यास देशभरात इंधनाचे दर दररोज वाढत होते. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त होती. मुंबईत तर पेट्रोलनं नव्वदी ओलांडली होती. यानंतर वाढता जनक्षोभ लक्षात घेता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारनं पेट्रोलच्या दरात पाच रुपयांची कपात केली होती. मात्र त्यानंतरही पेट्रोल, डिझेलचे दर दररोज वाढत होते. मात्र गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात घट होत असल्यानं सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :पेट्रोल