महाराष्ट्र लोकशाही समितीचा मोर्चा
By Admin | Updated: November 29, 2014 01:46 IST2014-11-29T01:46:36+5:302014-11-29T01:46:36+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड हत्याकांडाच्या निषेधार्थ महाराष्ट्र लोकशाही समितीच्या वतीने भायखळा येथे मोर्चा काढला.

महाराष्ट्र लोकशाही समितीचा मोर्चा
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड हत्याकांडाच्या निषेधार्थ महाराष्ट्र लोकशाही समितीच्या वतीने भायखळा येथे मोर्चा काढला. राणी बाग ते भायखळा रेल्वे स्टेशनर्पयत काढलेल्या या मोर्चात सुमारे पाच हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. हत्याकांडातील आरोपींना तातडीने अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, अशा घोषणाबाजीने राणी बाग परिसर कार्यकत्र्यानी दणाणून सोडला.
महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने राणी बाग ते भायखळा स्टेशनर्पयत मोर्चा काढला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. आघाडीत सहभागी असलेल्या भारिप बहुजन महासंघ, शेतकरी कामगार पक्ष, भाकपा, माकपा, शिक्षक भारती, श्रमिक मुक्ती दल, जनता दल सेक्युलर आदी पक्षांसह विविध संघटना सामील झाल्या. आरोपींना अटक न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा या वेळी नेत्यांनी दिला. (प्रतिनिधी)