आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ चेंबूरमध्ये मोर्चा

By Admin | Updated: July 14, 2016 02:23 IST2016-07-14T02:23:41+5:302016-07-14T02:23:41+5:30

दादर परिसरातील आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ आज चेंबूरमधील रहिवाशांनी मोर्चा काढला. यामध्ये सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

Front in Chembur protesting against the demolition of Ambedkar Bhawan | आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ चेंबूरमध्ये मोर्चा

आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ चेंबूरमध्ये मोर्चा

मुंबई : दादर परिसरातील आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ आज चेंबूरमधील रहिवाशांनी मोर्चा काढला. यामध्ये सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची ऐतिहासिक वास्तू गेल्या महिन्यात पाडून टाकण्यात आल्याच्या घटनेचा आंबेडकरी जनता निषेध करत आहे. हे भवन पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड, श्रीकांत गवारे यांना अटक करावी, या मागणीसाठी अनेक दिवसांपासून चेंबूर येथे मोर्चा आणि रास्ता रोको सुरू आहे. आजदेखील चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीतील आंबेडकरी जनता, भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन सेना, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादीसह सर्व आंबेडकरी संघटनांनी यात सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Front in Chembur protesting against the demolition of Ambedkar Bhawan