Join us

मैत्रिणीवरून वाद; मित्राची केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 07:14 IST

मैत्रिणीवरून सुरू असलेल्या वादातून मित्राची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याचा प्रकार मालवणीत सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणी विजय एस. उर्फ विशाल नावाच्या तरुणाला मालवणी पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या.

मुंबई : मैत्रिणीवरून सुरू असलेल्या वादातून मित्राची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याचा प्रकार मालवणीत सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणी विजय एस. उर्फ विशाल नावाच्या तरुणाला मालवणी पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या.गुरुवारी रात्री अंबुजवाडीमध्ये पप्पू पारधी (४०) नावाच्या इसमाची हत्या करण्यात आली. गुरुवारी रात्री ८च्या सुमारास विजयने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. पारधी हा जखमी झाल्याने, त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला. ही माहिती मालवणी पोलिसांना मिळाली.घटनेची वर्दी लागताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीचा शोध सुरू असताना, विजयने मालवणी पोलीस ठाणे गाठले. आपणच हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला हत्येच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या. विजय हा पेशाने शिक्षक आहे, तर पारधी हा अभिलेखावरील आरोपी होता. त्याच्या विरोधात मालवणी पोलिसात गुन्हा दाखल होता.दोघांमध्ये त्यांच्या एका मैत्रिणीवरून वाद होता. याच वादातून पारधीने २ दिवसांपूर्वी विजयला मारहाण केली होती. गुरुवारी रात्रीदेखील त्याला त्याने मारहाण केली. याच रागात विजयने पारधीचा काटा काढण्याचे ठरविले आणि चाकूने त्याच्यावर हल्ला चढविला. यात पारधीचामृत्यू झाला. या प्रकरणीमालवणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :खूनगुन्हा