Join us

स्कुटीवरून सोडण्यास नकार दिला म्हणून मित्राचा चिरला गळा, चेंबूर येथील घटना

By मनीषा म्हात्रे | Updated: January 7, 2024 17:33 IST

चेंबूर परिसरात राहणाऱ्या विरेंद्र सुरेंद्र वर्मा (२६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

मुंबई : स्कुटीवरून सोडण्यास नकार दिला म्हणून मित्रानेच मित्राचा  गळा चिरल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये समोर आला. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी हत्येचा प्रयत्त्न प्रकरणी गुन्हा नोंदवत,  रमेश नरसप्पा वाल्मिकी उर्फ जेडी (२८) याला अटक केली आहे.  

चेंबूर परिसरात राहणाऱ्या विरेंद्र सुरेंद्र वर्मा (२६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात वर्मा यांचा भाऊ विनय (२४) जखमी झाला आहे.  विनय यांनी रमेशला स्कुटीवरून सोडण्यास नकार दिला म्हणून राग आला. याच रागात जवळील चाकूने विनय यांच्या गेल्यावर वार केले. आरोपी रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच आरोपीने पळ काढला. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली.

स्थानिकांच्या मदतीने जखमीला तात्कळ जवळच्या रुग्णालयात नेले. रात्री गुन्हा नोंदवत आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :गुन्हेगारी