मूकबधिराने लुटले मित्राचे २७ तोळे सोने
By Admin | Updated: February 4, 2015 01:02 IST2015-02-04T01:02:19+5:302015-02-04T01:02:19+5:30
एरवी पैसे व चोरीच्या घटना घडतच असतात. पण मुलुंडमध्ये एका मुकबधिराने मैत्री करुन मुकबधिरालाच गंडा घातला. यातील धक्कादायक बाब म्हणजे आरोपीही मुकबधिर महिला आहे.

मूकबधिराने लुटले मित्राचे २७ तोळे सोने
मुंबई: एरवी पैसे व चोरीच्या घटना घडतच असतात. पण मुलुंडमध्ये एका मुकबधिराने मैत्री करुन मुकबधिरालाच गंडा घातला. यातील धक्कादायक बाब म्हणजे आरोपीही मुकबधिर महिला आहे. या महिलेने एका मुकबधिर जोडप्याला भुरळ घालून त्यांंच्याशी मैत्री केली व संधी साधून त्यांंच्या घरात घुसली आणि २७ तोळे सोने लांबवले.
आरोपी मुकबधिर महिलेचे नाव रोनाल्डो व्यंकट स्वामी श्रीगती (३५) असे आहे. पोलिसांनी दुभाषीच्या मदतीने गुन्ह्याचा छडा लावत रोनाल्डोकडून गुन्ह्याची कबुली घेतली.
मुलुंड पूर्वेकडील आकाशदीप अपार्टमेंटमध्ये मानसी प्रभू ही विवाहिता आपल्या वृद्ध मुकबधिर सासू सासऱ्यांसमवेत राहण्यास आहे. दरम्यान एका पार्टीत प्रभू दाम्पत्याची रोनाल्डोशी ओळख झाली. रोनाल्डोचे घरी येणे जाणे वाढले. पहिल्या भेटीतच प्रभू यांच्या सासुने त्यांच्याकडील २७ तोळे सोने रोनाल्डोला दाखवले. सोने बघताच रोनाल्डोची नजर फिरली. १६ जानेवारी २०१५ रोजी रोनाल्डो डे्रस फाटल्याचा बहाणा करुन मैत्रिणीसोबत प्रभू दामप्त्याच्या घरी आली. डे्रस शिऊन देण्यासाठी तिने प्रभू यांंच्या सासुकडे मदत मागितली. तत्काळ अंगावरील डे्रस चेन्ज करुन तो प्रभू यांंच्या सासुक डे दिला. आणि संधी साधून रोनाल्डोने घरातील २७ तोळे सोन्यावर हात साफ केले. ३१ जानेवारी रोजी घर शिफ्ंिटग दरम्यान घरातील सोने चोरी झाल्याचे प्रभू दाम्प्त्याच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ मुलुंड नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी प्रभू यांंच्या तक्रारीवरुन रोनाल्डोसह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. (प्रतिनिधी)