मुंबई : आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागात मित्राला धावत्या ट्रेनमधून फेकून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १० ने मंगळवारी आरोपीस अटक केली. तो पाकीटमार आहे.रशीद उर्फ राजू सय्यद या बेपत्ता तरुणाचा मृतदेह नाशिकला रेल्वे ट्रॅकवर आढळला. रशीदची त्याच्याच मित्राने हत्या केल्याची माहिती कक्ष १० चे प्रमुख सुनील माने यांना मिळाली होती. त्यांच्या पथकाने तपासाअंती अन्वर सय्यदला (१९)ताब्यात घेतले. अन्वर, रशीद दोघेही पाकीटमार होते. लोकलमध्ये एकत्र चोऱ्या करायचे. रशीदचे आईसोबत अनैतिक संबंध असल्याचे अन्वरला समजले होते. त्यामुळे तो रागात होता. त्यातच चोरीचा माल वाटून घेण्यावरून दोघांत भांडण झाले. या रागात त्याने रशीदला लोकलमधून फेकून दिले. यात त्याचा मृत्यू झाला.
आईसोबत अनैतिक संबंध; मित्राची हत्या आरोपीस अटक; धावत्या ट्रेनमधून दिले होते फेकून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 06:37 IST