Join us  

लॉकडाऊनमध्ये माथेरानच्या राणीतून मालवाहतूक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 7:06 PM

लॉकडाऊन काळात माथेरानची राणी असलेली मिनी ट्रेन बंद होती.

 

मुंबई : लॉकडाऊन काळात माथेरानची राणी असलेली मिनी ट्रेन बंद होती. मात्र हि ट्रेन शुक्रवारपासून फक्त मालवाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. पार्सल आणि माल वाहतुकीचे दोन डबे घेऊन माथेरान ते अमन लॉंज मिनी ट्रेनचा प्रवास झाला. 

  लॉकडाउनमुळे माथेरानची मिनी ट्रेन बंद करण्यात आली असल्यामुळे येथील स्थानिकांना अत्यावश्यक वस्तुंची ने-आण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मिनी ट्रेन सुरु करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार रायगडच्या जिल्हाधिकाºयांनी मध्य रेल्वेशी संपर्क केला असून अमन लॉज ते माथेरान मिनी ट्रेनची सेवा सुरु करण्याचे आदेश दिले. 

माथेरान हे हिल स्टेशन आणि इको झोन असल्यामुळे तेथे वाहनांनी वाहतुक केली जात नाही. वाहने अमन लॉजपर्यतच जातात. तेथून पुढे माथेरानपर्यत फक्त मिनी ट्रेन धावते. माथेरानमध्ये सुमारे ६ हजार ५०० जणांची वस्ती आहे. हेसर्व नागरिक सध्या अत्यावश्यक वाहतूकीसाठी जवळजवळ ४६० घोडे आणि हातगाड्यांवर अवंलबुन आहेत. लॉकडाउन सुरु झाल्यापासून मिनी ट्रेनची वाहतुक बंद करण्यात आल्यामुळेयेथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. परिणामी या नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने रायगड जिल्ह्याधिकाºयांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी मध्य रेल्वेशी मिनी ट्रेनची वाहतुक सुरु करण्यासंदर्भात संपर्क साधला. त्यानुसार शुक्रवारपासून फक्त माल वाहतुकीसाठी मिनी ट्रेन सुरु झाली आहे. मिनी ट्रेनने एका दिवसात २ हजार ७०० किग्रॅ वजनाचे साहित्याची वाहतूक केली. यावेळी रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी मास्क, सॅनिटायझर याचा वापर केला. यासह थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी केली असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस