स्वातंत्र्यदिन उत्साहात

By Admin | Updated: August 16, 2014 00:51 IST2014-08-16T00:51:23+5:302014-08-16T00:51:23+5:30

पनवेलमध्ये स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला

Freedom Day | स्वातंत्र्यदिन उत्साहात

स्वातंत्र्यदिन उत्साहात

पनवेल : पनवेलमध्ये स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर ठिकठिकाणी ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
छत्रपती संभाजी मैदानात प्रांताधिकारी सुदाम परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्षा चारूशीला घरत, तहसिलदार पवन चांडक, मुख्याधिकारी मंगेश चितळे उपस्थित होते. पनवेल नगरपालिकेच्या इमारतीत नगराध्यक्षा चारूशीला घरत यांनी, तर तहसील कार्यालयात पवन चांडक यांनी ध्वजारोहण केले. याव्यतिरिक्त विविध राजकीय पक्षांची कार्यालये, अकादमी, सामाजिक संस्थांत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. यानिमित्ताने सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम पार पडले.
नागोठणे : भारताचा ६८ वा स्वातंत्र्यदिन सोहळा शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. को.ए.सो. च्या बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात शाळा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या विद्यासंकुलात अध्यक्ष किशोर जैन, तर नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू हायस्कूलमध्ये समद अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शहरातील पोलिस ठाणे, सरकारी कार्यालये, बँका, पतपेढ्या,प्रियदर्शनी सहकारी वाहतूक संस्था,अनिरुद्ध उपासना केंद्र येथे सुद्धा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. शहराचा मुख्य ध्वजवंदन कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात घेण्यात आला.सरपंच प्रणय डोके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ग्रामसभा घेण्यात आली.
रसायनी : जनता विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोहोपाडा (ता. खालापूर) येथे ६८ व्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष रामशेठ मुंढे यांच्याहस्ते उत्साहात झाले. राष्ट्रगीत, ध्वजगीतानंतर मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी, ज्यु.कॉलेज आणि टाकेदेवी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजपर गीतांचे गायन केले.
पाली : येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुधागडचे तहसीलदार व्ही.के. रौंदळ यांच्याहस्ते पार पडला. यावेळी निवासी नायब तहसीलदार किरण पाटील, गटविकास अधिकारी एस.बी. भोये, पोलीस निरीक्षक पवार, समन्वय समिती अध्यक्ष जितुशेठ म्हात्रे, शे.का.प.चे सुरेशशेठ खैरे, सभापती पुष्पा डुमणा, पाली सरपंच राजेश मपारा, पंचायत समिती सदस्य रमेश साळुंखे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र राऊत, भाजपा पक्ष तालुकाध्यक्ष भाऊ गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका उपाध्यक्ष सतिश देशमुख, शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व्यापारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालीचे सरपंच राजेश मपारा यांनी यंदा दहीहंडी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा न करता ११०००/-रु. माळीण दुर्घटनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले.

Web Title: Freedom Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.