खासगी रुग्णालयात क्षयरोगावर मोफत उपचार

By Admin | Updated: March 24, 2015 00:55 IST2015-03-24T00:55:26+5:302015-03-24T00:55:26+5:30

खासगी रुग्णालयात क्षयरोगावर उपचार घेणारे काही रुग्ण आर्थिक अडचणींमुळे उपचार सोडून देतात. यामुळे क्षयरोगाचा धोका अधिक वाढतो.

Free treatment for tuberculosis in private hospitals | खासगी रुग्णालयात क्षयरोगावर मोफत उपचार

खासगी रुग्णालयात क्षयरोगावर मोफत उपचार

मुंबई : खासगी रुग्णालयात क्षयरोगावर उपचार घेणारे काही रुग्ण आर्थिक अडचणींमुळे उपचार सोडून देतात. यामुळे क्षयरोगाचा धोका अधिक वाढतो. हे टाळण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयात क्षयरुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी ‘ई-औषध व्हाऊचर’ ही योजना सुरू केली आहे.
२४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून सोमवार, २३ मार्च रोजी महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्या हस्ते ‘ई-औषध व्हाऊचर’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
क्षयरुग्ण उपचार अर्धवट सोडत असल्यामुळे औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. आर्थिक अडचणींमुळे हे घडत असल्याचे लक्षात आले. यामुळेच क्षयरोग रोखण्यासाठी ही मोहिम सुरू केली आहे. बिल अ‍ॅण्ड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन महापालिकेला क्षयरोगाच्या मोहिमेत आर्थिक सहाय्य करते. या मोहिमेसाठी आत्तापर्यंत ५७ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सहा महिन्यांपासून ही मोहिम कागदी पावतीवर सुरू केली आहे. गेल्या ६ महिन्यांत ४ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. १ हजार ३८९ हजार वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रशिक्षण झाले आहे. ४ जिन एक्सपर्ट प्रयोगशाळा, ८८ रुग्णालये आणि ९२ औषधविक्रेते यात सहभागी असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. अरूण बामणे यांनी दिली.
क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. या रोगाचे निदान करण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात असलेली यंत्रणा सक्षम आहे, असे डॉ. बामणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

श्वसनविकार तज्ज्ञांकडून आलेल्या अहवालानुसार जिन एक्सपर्ट चाचणी केली जाते. यातील एक्स-रे मोफत तर जिन एक्स्पर्ट चाचणी २५ टक्के किंमतीत केली जाते. क्षयरोग असल्याचे निश्चित झाल्यावर डॉक्टरकडून औषधे लिहून दिली जातात. या रुग्णाला प्रणालीमध्ये समाविष्ट असणाऱ्या डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन मिळाल्यानंतर रुग्णालय अथवा क्लिनिकमधून एका टोल फ्री क्रमांकावर फोन करणार. यावेळी रुग्णाचे नाव, डॉक्टरचे नाव, रुग्णालयाचे नाव, प्रिस्क्रिप्शनची माहिती देण्यात येईल. यानंतर संपर्क केंद्रातून एक ई - औषध व्हाऊचर क्रमांक देण्यात येणार आहे. संपर्ककेंद्र रुग्णाला संपर्क साधून माहितीची शहानिशा करते. यानंतर रुग्णाला ई व्हाऊचर मिळते.

क्षयरोगावर उपचार
घेणाऱ्यांची संख्या
वर्षरुग्ण
२०१०२९,६८५
२०११२९,२१२
२०१२३०,८२८
२०१३३१,७८९
२०१४३१,२०७


मल्टिड्रग्ज रजिस्टंट
टीबी रुग्णांची संख्या
वर्षरुग्ण
२०१०१११
२०११४१०
२०१२२,१९५
२०१३२९०३
२०१४३,५२२
२०१५ २३४
(जानेवारी)
एक्सट्रीम ड्रग्ज
रजिस्टंट टीबी रुग्ण
वर्षरुग्ण
२०१००
२०११०
२०१२३३
२०१३११२
२०१४३९६
२०१५८६

मृत्यू झालेल्या
रुग्णांची संख्या
वर्षमृत्यू
२००८११५४
२००९१२७४
२०१०११८५
२०१११२४६
२०१२१३८९
२०१३१३९३
२०१४१३३४

Web Title: Free treatment for tuberculosis in private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.