Join us  

'राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, जनआरोग्य योजना सुरू करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 4:51 PM

कल्याण डोंबिवलीत वास्तव्याला असलेले आणि मुंबईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचा:यांना कोरोनाची लागण होत आहे. त्यांच्यामुळे कोरोनाची संख्या कल्याण डोंबिवलीत वाढली आहे

मुंबई - कल्याण डोंबिवली महापालिकेतील 27 गावातील सफाई कामगरांना विमा संरक्षण मिळावे अशी मागणी कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. आमदार पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत कोरोना संदर्भात विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर, आता राज्य आणि केंद्र सरकारची कोविड १९ संदर्भातील उपाययोजना परिपूर्ण नसल्याचे सांगत, कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे

कल्याण डोंबिवलीत वास्तव्याला असलेले आणि मुंबईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचा:यांना कोरोनाची लागण होत आहे. त्यांच्यामुळे कोरोनाची संख्या कल्याण डोंबिवलीत वाढली आहे. या कर्मचाऱ्यांची मुंबईत राहण्याची व्यवस्था केल्यास कल्याण डोंबिवलीतील रुग्णांची संख्या कमी होऊन महापालिका क्षेत्र रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये येऊ शकते. अजूनही वेळ गेलेली नाही. याकडे कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधले होते. आता, राज्यातील कोविड १९ ची बाधा असलेल्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. 

केंद्र व राज्य सरकारच्या प्रचिलित आरोग्य योजनेंतर्गत कोविड रुग्णांची मदत करण्याचा प्रयत्न अत्यंत तोकडा आहे. त्वरीत देश व राज्य पातळीवर विशेष बाब म्हणून फक्त कोविड १९ साठी सर्वांना मोफत उपचार मिळेल अशी नवीन जनआरोग्य योजना आणावी, अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे. मनसेनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊँटवरुन याबाबत माहिती दिली.  

राज्य सरकारने पांढऱ्या रंगाच्या रेशनकार्ड धारकांना कोरोना उपचाराचे बिल आकारले जाईल असे स्पष्ट केले आहे. पिवळ्य़ा व केशरी रंगाच्या रेशनकार्डधारकांना महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचाराचा लाभ दिला जाईल. रेशनकार्डचा रंग पाहून उपचारात सूट न देता. राज्य सरकारने यापूर्वी केलेल्या घोषणोनुसार सरसकट सगळ्य़ाच कोरोना रुग्णांचा उपचार मोफत करावी याकडे लक्ष वेधले आहे. 

टॅग्स :मनसेमुंबईराजू पाटीलकोरोना वायरस बातम्या