राज्य तंबाखूमुक्त करा
By Admin | Updated: September 2, 2015 02:55 IST2015-09-02T02:55:28+5:302015-09-02T02:55:28+5:30
शाळा, महाविद्यालयांच्या १०० यार्ड (९१.४४ मीटर) परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी असून खुलेआम विक्री सुरू असते.

राज्य तंबाखूमुक्त करा
मुंबई : शाळा, महाविद्यालयांच्या १०० यार्ड (९१.४४ मीटर) परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी असून खुलेआम विक्री सुरू असते. यामुळे लहान मुलांच्या आरोग्यास धोका आहे. हे टाळण्यासाठी राज्य तंबाखूमुक्त करण्यासाठी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट घेतली.
तंबाखूमुक्त वातावरण मिळावे म्हणून सुट्या सिगारेट विक्रीवर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. कुलाबा येथील महापालिका शाळेचे बालपंचायतचे विद्यार्थ्यांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी विद्यार्थ्यांनी आरोग्यमंत्र्यांना एक निवेदन दिले. हे विद्यार्थी तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था बनवण्यासाठी शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. गुटखा, पानमसाला विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात ६ ते १० रुपये किंमतीला विक्री होते. यामुळे तरुणांचे आरोग्य धोक्यात आहे. हे लक्षात घेऊन सरकारने योग्य ती कारवाई करावी, असा आग्रह विद्यार्थ्यांनी धरला.