मोबाइल तिकिटांसाठी आता स्वतंत्र रांग

By Admin | Updated: March 24, 2015 02:06 IST2015-03-24T02:06:52+5:302015-03-24T02:06:52+5:30

मोबाइल तिकीट असलेली सेवा सध्या एटीव्हीएम मशिनवरच देण्यात येत आहे. या सेवेसाठी स्वतंत्र मशिनही उपलब्ध करण्याचा निर्णय झाला

Free queue for mobile tickets | मोबाइल तिकिटांसाठी आता स्वतंत्र रांग

मोबाइल तिकिटांसाठी आता स्वतंत्र रांग

मुंबई : मोबाइल तिकीट असलेली सेवा सध्या एटीव्हीएम मशिनवरच देण्यात येत आहे. या सेवेसाठी स्वतंत्र मशिनही उपलब्ध करण्याचा निर्णय झाला असून, पश्चिम आणि मध्य रेल्वेला मिळून ५0 स्वतंत्र मशिन उपलब्ध केल्या जाणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यामुळे मोबाइल तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांना यापुढे स्वतंत्र रांग लावावी लागणार आहे.
२७ डिसेंबर रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दादर स्थानकात मोबाइल अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात आला आणि या दिवसापासून प्रवाशांना सेवा देण्यास सुरुवात झाली. रेल्वेच्या क्रिसकडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम) मोबाइल तिकीट सेवा उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्यात आले. हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉइड फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरमधून तर विंडोज फोनवर विंडोज स्टोअरमधून डाऊनलोड करण्याची सोय आहे. सध्या एटीव्हीएम मशिनवरच ही सोय उपलब्ध करण्यात आली असून, स्मार्ट कार्ड प्रवासी आणि मोबाइल तिकीट सेवा घेणाऱ्या प्रवाशांची एकाच मशिनवर तिकीट मिळविण्यासाठी धांदल उडत आहे. त्यामुळे मोबाइल तिकीटसेवेसाठी स्वतंत्र मशिन देण्याचा विचार रेल्वे मंत्रालयाकडून सुरू होता आणि त्यावर कामही केले जात होते. स्वतंत्र मशिन सेवा उपलब्ध करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून टेंडर काढण्यात आले होते आणि यासाठी कंपन्यांकडून टेंडरही भरले गेले आहेत. या टेंडरचे सध्या मूल्यमापन सुरू असून, लवकरच मोबाइलसाठी स्वतंत्र मशिन सेवा देणाऱ्या कंपनीला हे काम देण्यात येईल आणि त्यानंतर तीन महिने या मशिन बनविण्यासाठी लागतील, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

डिसेंबर २0१४ ते मार्च २0१५ पर्यंत ८ हजार ५0 प्रवाशांनी मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करताना यातून ६ हजार ९३३ तिकीट काढण्यात आले आहेत. तर ७९८ जणांनी रिचार्ज केले असून, १ लाख ५00 रुपये रिचार्जमधून मध्य रेल्वेला मिळाले आहेत. तर एकूण उत्पन्न १ लाख १९ हजार ४५0 रुपये मिळाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Free queue for mobile tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.