मुंबई - विधान परिषदेच्या उपसभापतीपदी काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता कमी असल्याने शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपसभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करतील. युतीत उपसभापती पद शिवसेनेच्या वाट्याला आले आहे. शिवसेनेने नीलम गोऱ्हे यांचे नाव नक्की केले आहे.काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या गटनेते पदी निवड केली. त्यांना विरोधी पक्षनेते करण्याबाबत आघाडीने विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्रही पाठविले आहे.
नीलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 05:20 IST