कुंभमेळ्यात येणाऱ्या भक्तांसाठी विनामूल्य निवासी सोय!
By Admin | Updated: July 7, 2015 00:31 IST2015-07-07T00:31:26+5:302015-07-07T00:31:26+5:30
त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थाला येणाऱ्या भक्तांसाठी विविध सामाजिक संस्थांनी त्यांच्या परीने योगदान देण्याचे ठरविले आहे.

कुंभमेळ्यात येणाऱ्या भक्तांसाठी विनामूल्य निवासी सोय!
डोंबिवली : त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थाला येणाऱ्या भक्तांसाठी विविध सामाजिक संस्थांनी त्यांच्या परीने योगदान देण्याचे ठरविले आहे. अशाच पद्धतीने येथील श्री पंचायती बडा उदासीन आखाड्याच्या माध्यमातून सुमारे ५ हजार भक्तांची निवासासह अन्य व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा विनामूल्य असल्याची माहिती मुरबाड येथील आखाड्याचे प्रचारप्रमुख नामदेव हरड यांनी दिली.
१४ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत महादेव मंदिरामागे असलेल्या रिंग रोड येथे ही व्यवस्था असेल. येथे भक्तांसाठी शाहीस्रानासह अन्नछत्र आणि धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे. आखाड्याच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या हरड यांची संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ही निवड आखाड्याचे प्रबंधक रघू मुनी यांनी केली. (प्रतिनिधी)