व्यावसायिकाची १२ लाखांना फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:06 IST2021-05-31T04:06:56+5:302021-05-31T04:06:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चांदीचे बार चांगल्या किमतीमध्ये विक्री करून देण्याच्या नावाखाली गिरगावातील व्यावसायिकाची १२ लाख रुपयांना फसवणूक ...

व्यावसायिकाची १२ लाखांना फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चांदीचे बार चांगल्या किमतीमध्ये विक्री करून देण्याच्या नावाखाली गिरगावातील व्यावसायिकाची १२ लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
तक्रारदार यांचे मुंबादेवी येथे सौंदर्यप्रसाधने विक्रीचा व्यवसाय आहे. दुकानाच्या शेजारी राहणाऱ्या सोनम (२७) आणि त्यांचे पती गणेश यांच्याशी त्यांची ओळख आहे. तक्रारदार यांच्या आईने त्यांच्याकडे दिलेल्या बॉक्समध्ये २१ चांदीचे बार व एक सोन्याचे बिस्किट होते. चांदीच्या बारचे वजन १९ किलो १५३ ग्रॅम भरले. त्याची किंमत १२ लाख १२ हजार ३८५ रुपये होती.
झवेरी बाजारमधील विविध सोने व्यापाऱ्यांशी त्यांनी संपर्क साधला. मात्र योग्य किंमत मिळत नसल्याने त्यांनी हे बार विकले नाहीत. मित्रांकडून पैसे जमवून त्यांनी आईचे अंतिम क्रियाकर्म पार पाडले. गणेश याने त्यांना बाजारामध्ये त्यांच्या ओळखीचे बरेच व्यापारी असून चांदीच्या बारची योग्य ती किंमत मिळवून देणाऱ असल्याचे सांगितले.
मात्र २१ बार घेऊन तो पसार झाला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.
........