केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 02:07 IST2020-01-09T02:06:53+5:302020-01-09T02:07:22+5:30
केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ठगांनी चर्चगेटमधील ५३ वर्षांचे गौरव यांच्या खात्यातून १ लाख ४९ हजार रुपये काढल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूक
मुंबई : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ठगांनी चर्चगेटमधील ५३ वर्षांचे गौरव यांच्या खात्यातून १ लाख ४९ हजार रुपये काढल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
गौरव यांच्या मोबाइलवर ११ डिसेंबरला केवायसी अपडेट करण्याबाबतचा संदेश मोबाइलवर धडकला. त्यानंतर, अनोळखी व्यक्तीने कॉल करून केवायसी अपडेट न केल्यास पेटीएम बंद होणार असल्याची भीती घातली. त्यांनीही विश्वास ठेवून कॉलधारकाने सांगितल्याप्रमाणे क्विक सर्पोट अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अॅप डाऊनलोड करताच त्यांच्या खात्यातून पैसे जाण्यास सुरुवात झाली.