बँकेचे केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली महिला डॉक्टरची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:08 IST2021-02-06T04:08:17+5:302021-02-06T04:08:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरची १५ हजार रुपयांना फसवणूक ...

बँकेचे केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली महिला डॉक्टरची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरची १५ हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली.
हाजीअली परिसरात राहणाऱ्या ३७ वर्षीय तक्रारदार या केईएम रुग्णालयात काम करीत असताना, ११ जानेवारी रोजी त्यांच्या मोबाईलवर संदेश आला. त्यात, तुमचे कोटक महिंद्रा बँकेचे अकाउंट बंद करण्यात आले असून, केवायसी अपडेट करण्यास सांगत खाली लिंक देण्यात आली. त्यांनी लिंक उघडताच त्यांना कस्टमर रिलेशनशिप नंबरबाबत विचारणा झाली. त्यांनी तो क्रमांक टाकला. त्यानंतर अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलधारकाने त्याचे नाव अंकित वर्मा असून, तो कोटक महिंद्रा बँकेतून बोलत असल्याचे सांगितले.
तुमची माहिती अपडेट नसल्याचे सांगून ती व्यवस्थित करण्यास सांगितले. मध्येच कॉल कट होताच त्यांच्या माेबाईलवर सहा ओटीपी आले. यात त्यांच्या खात्यातून १५ हजार रुपये कमी झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बुधवारी भाेईवाडा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पाेलीस अधिक तपास करीत आहेत.
..............................