गावंड यांच्यासह चौघे स्वगृही
By Admin | Updated: April 17, 2015 22:57 IST2015-04-17T22:57:19+5:302015-04-17T22:57:19+5:30
विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजन गावंड यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता.

गावंड यांच्यासह चौघे स्वगृही
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजन गावंड यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेऊन शुक्रवारी कृष्णकुंज येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेचा झेंडा पुन्हा हाती घेतला आहे.
त्यांच्यासह श्रेया तटकरे, हसमुख शहा आणि श्रीनिवास जोशी यांनीही मनसेत पुर्नप्रवेश केला. मनसेला रामराम केला तेव्हा गावंड यांच्याकडे बुलडाणा संपर्कप्रमुख, रोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे जिल्हा प्रवक्ते या पदांची जबाबदारी होती. मध्यंतरी मी नाराज होतो. पण, आपला पिंड मनसेचा असल्याने स्वगृही परतलो असे गावंड म्हणाले.