चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे उपोषण

By Admin | Updated: August 31, 2015 01:54 IST2015-08-31T01:54:10+5:302015-08-31T01:54:10+5:30

अनुकंपा व वारसा हक्काने नोकरी आणि कंत्राटी पद्धत बंद करण्याच्या मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी १ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे

Fourth category employees' fasting | चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे उपोषण

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे उपोषण

मुंबई : अनुकंपा व वारसा हक्काने नोकरी आणि कंत्राटी पद्धत बंद करण्याच्या मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी
१ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जिवाचे काहीही बरे-वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी सरकारवर
टाकत देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधी १ सप्टेंबरला उपोषण आणि ७ सप्टेटंबरपासून चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना समन्वय समितीने बेमुदत बंदची हाक दिली. त्याला जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह कोतवालांनी पाठिंबा दिला. त्यानंतर समन्वय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब
पठाण यांनी १ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेत देहदान करण्याचा निर्णय
घेतला आहे. तर इतर संघटनांची पदाधिकारी साखळी उपोषण करून त्यांना साथ देतील.

Web Title: Fourth category employees' fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.