एक्स्प्रेसच्या धडकेत चार महिला ठार

By Admin | Updated: January 21, 2015 02:05 IST2015-01-21T02:05:08+5:302015-01-21T02:05:08+5:30

रुळ ओलांडणाऱ्या चार महिलांचा छपरा एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी आसनगाव रेल्वे स्थानक परिसरात घडली.

Four women killed in a tremor | एक्स्प्रेसच्या धडकेत चार महिला ठार

एक्स्प्रेसच्या धडकेत चार महिला ठार

शहापूर : रुळ ओलांडणाऱ्या चार महिलांचा छपरा एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी आसनगाव रेल्वे स्थानक परिसरात घडली.
या महिला उल्हासनगरहून शहापूर येथील गुरूद्वारामध्ये प्रार्थनेसाठी आल्या होत्या. आसनगाव येथे दुपारी ३़३० वाजता कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलमधून उतरल्या. आसनगाव पूर्वेकडे जाण्यासाठी रुळ ओलांडताना नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या गोरखपूर-मुंबई छपरा एक्सप्रेसची त्यांना धडक बसल्याने त्या जागीच ठार झाल्या. इंद्रा रमेशलाल गिडवानी (५०), महक कमलेश गिडवानी (२७), सुरजितकौर इंद्रजीतसिंग बागा (३२), अनु गिरधारी सुनेथा (३८) अशी त्यांची नावे आहेत. त्या उल्हासनगर-३ भागातील रहिवासी आहेत.

Web Title: Four women killed in a tremor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.