रसायनीतील रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण

By Admin | Updated: June 23, 2015 23:15 IST2015-06-23T23:15:19+5:302015-06-23T23:15:19+5:30

रसायनीतील पाताळगंगा व अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक परिसरात जाणारा रस्ता पराडा कॉर्नर ते सिद्धेश्वरी कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याची अवस्था खराब झालेली होती.

Four-way road full of chemicals | रसायनीतील रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण

रसायनीतील रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण

रसायनी : रसायनीतील पाताळगंगा व अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक परिसरात जाणारा रस्ता पराडा कॉर्नर ते सिद्धेश्वरी कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याची अवस्था खराब झालेली होती. याच मार्गावरून कंटेनर, ट्रेलर, ट्रॅक्टर, डंपर व इतर हलक्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात रिलायन्स, बॉम्बे डार्इंग, सिप्ला, एल्डर व इतर छोट्या कंपन्या, अतिरिक्त पाताळगंगा विभागात औटीकर, जिंदाल इ. कंपन्या आहेत. तर त्याच परिसरात १५ ते २० छोटी-मोठी गावे आहेत.
एमआयडीसीने वर्षभरात रस्त्याचे चौपदरीकरण नुकतेच पूर्ण केले आहे. त्यामुळे वाहनचालक, कामगार, कंपन्या व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. हा रस्ता सिमेंट क ाँक्रिटचा केला असून पूर्वीपेक्षा तीन फुटांपर्यंत त्याची उंची वाढवलेली आहे. पूर्वी कडेला असणारे पथदिवे आता रस्त्याच्या मध्यभागी लावलेले आहेत. मध्यभागीच हिरवळ लावलेली व ठराविक अंतरावर झाडेही लावलेली आहेत. हा रस्ता पाताळगंगा पुलावरून जातो. पाताळगंगेवर जुन्या पुलाला जोडून नवा पूलही व्हावा, अशी अपेक्षा कामगार, नागरिक करीत आहेत.

Web Title: Four-way road full of chemicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.