राज्यात दिवसभरात चार हजार ३८२ रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:16 IST2021-01-08T04:16:30+5:302021-01-08T04:16:30+5:30
मुंबई - राज्यात बुधवारी ४,३८२ नवीन रुग्णांचे निदान आणि ६६ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील काेरोनाबाधित रुग्णांची ...

राज्यात दिवसभरात चार हजार ३८२ रुग्णांची नोंद
मुंबई - राज्यात बुधवारी ४,३८२ नवीन रुग्णांचे निदान आणि ६६ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील काेरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९,५४,५५३ झाली आहे; तर मृतांचा आकडा ४९ हजार ८२५ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात ५० हजार ८०८ रुग्ण उपचाराधीन आहेत.
राज्यात दिवसभरात २,५७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,५२,७५९ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७९ टक्के, तर मृत्युदर २.५५ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासलेल्या १,३१,३४,०१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,५४,५५३ (१४.८८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,३३,८७५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २,५२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.