स्वाइनचे चार बळी

By Admin | Updated: August 1, 2015 04:54 IST2015-08-01T04:54:21+5:302015-08-01T04:54:21+5:30

मार्चनंतर पुन्हा एकदा जुलै महिन्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, स्वाइनने एकाच दिवशी मुंबई, भार्इंदर, बदलापूर आणि उरणमध्ये एकूण चार जणांचा बळी गेला आहे.

Four swine suicides | स्वाइनचे चार बळी

स्वाइनचे चार बळी

मुंबई : मार्चनंतर पुन्हा एकदा जुलै महिन्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, स्वाइनने एकाच दिवशी मुंबई, भार्इंदर, बदलापूर आणि उरणमध्ये एकूण चार जणांचा बळी गेला आहे.
भायखळा येथे राहणाऱ्या ९ महिन्यांच्या मुलीला नायर रुग्णालयात २५ जुलै रोजी दाखल करण्यात आले. स्वाइनचे निदान झाल्यावर तिला २६ जुलैपासून टॅमिफ्लू देण्यास सुरुवात केली होती. तिला न्यूमोनियाचीही लागण झाली होती. उपचारादरम्यान तिचा ३० जुलै रोजी मृत्यू झाला, अशी माहिती महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळाली आहे. बदलापूर येथील चोनगावातील अरुणा रोकडे (३१) या महिलेचाही स्वाइने मृत्यू झाला. भार्इंदरमध्ये गेल्या ६ दिवसांत दुसरा बळी गेला आहे. मोदी पटेल मार्गावरील मेहता-पटेल शॉपिंग सेंटरमध्ये राहणाऱ्या सेरली फरदा सानी (६०) या वृद्धेचा स्वाइन फ्लूची लागण झाल्यामुळे २५ जुलै रोजी मीरा रोड येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
उरण तालुक्यात स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू झाला आहे. मदन रघुनाथ पाटील (४३) असे या व्यक्तीचे नाव असून तो कंठवली येथे राहणारा आहे. मदन हा २५ जुलैपासून आजारी होता. सुरुवातीला त्याच्यावर खासगी रुग्णालयात व नंतर वाशी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी पहाटे त्याचे निधन झाले.

Web Title: Four swine suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.