चार सारांश बातम्या......
By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:15+5:302014-11-21T22:38:15+5:30
गृहनिर्माण संस्थेचा मार्गदर्शन मेळावा

चार सारांश बातम्या......
ग हनिर्माण संस्थेचा मार्गदर्शन मेळावामुंबई : गोराई महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था असोसिएशनतर्फे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका, नवीन सहकार कायदा, सहकारी संस्थेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन याबाबत येत्या २३ तारखेला बोरीवली पश्चिम येथे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे. शासनाच्या सहकार खात्याचे अधिकारी व गृहनिर्माण तज्ज्ञ मंडळी यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे......................इनऑर्बिट मॉलमध्ये मत्स्य प्रदर्शनमुंबई : मालाड येथील इनऑर्बिट मॉलमध्ये लौकिक क्रिएशनच्या साथीने २४ ते ३० नोव्हेंबर रोजी मत्स्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात रंगीबेरंगी मासे, आणि जलसंपदा पाहायला मिळणार आहे. गोल्ड फिश, स्टिंग रे, स्टार्गेन, पिकॉक बास, रॉयल डिस्कस, ऑस्कर यांसह देशी-विदेशी मासे या प्रदर्शनात मत्स्यप्रेमींना पाहायला मिळणार आहे........................दलित जनतेचा उपोषणाचा इशारामुंबई : जवखेडा हत्याकांडाला एक महिना पूर्ण झाला तरी गुन्हेगार मोकाट फिरत आहे. सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांचे आंदोलन चिरडणार्या सरकारच्या निषेधार्थ मानखुर्द विभागातील बौद्ध बांधव व बहुजन समाज २३ नोव्हेंबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे................इंदू मिलचा ताबा घेण्याचा इशारामुंबई : इंदू मिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी सरकारने त्वरीत पावले न उचलल्यास ६ डिसेंबर रोजी इंदू मिलचा ताबा घेऊ, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी दिला. रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन सोहळ्यात ते बोलत होते.........................