चार विद्यार्थी मनोरमधून बेपत्ता
By Admin | Updated: October 11, 2014 00:12 IST2014-10-11T00:12:57+5:302014-10-11T00:12:57+5:30
येथील रिद्धीसिद्धी कॉम्पलेक्स मध्ये राहणारे चार विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाले असून त्यात दोन मुले व दोन मुलींचा समावेश आहे.

चार विद्यार्थी मनोरमधून बेपत्ता
मनोर : येथील रिद्धीसिद्धी कॉम्पलेक्स मध्ये राहणारे चार विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाले असून त्यात दोन मुले व दोन मुलींचा समावेश आहे. मनोर पोलीस ठाण्यात मिसींगची केस दाखल झाली आहे.
एकाच घरातील राम (१३) व , सुमित रामलखन शाहु (११) गौरव संतोष वर्मा (८), छाया सलमान चव्हाण (११) हे ७ आॅक्टोबरला ३.४५ वा. च्या सुमारास बेपत्ता झाले. मनोर परिसरातील पालकवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तर मुले पळविणारी टोळी सक्रिीय झाली असावी त्यांनीच या चौघांना पळविले असावे अशी चर्चा सध्या सुरू आहे. सहा पो. निरीक्षक मारोती पाटील यांनी सांगितले की रिद्धीसिद्धी कॉम्प्लेक्स मध्ये बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज मध्ये त्या चौघे मुले आपल्या घरी आले पुन्हा बॅग घेऊन परत मनोर पालघर रस्त्यापर्यंत जाताना दिसत आहे. नंतर कुठे गेले ते त्या फुटेजमध्ये दिसत नाही तरी आम्ही त्यांचे फोटो प्रत्येक पोलीस ठाण्यात परीसरात दिले आहेत शोध मोहिम सुरू आहे.
ज्याअर्थी ही मुले स्वत: कॉम्प्लेक्सबाहेर जाताना दिसत आहेत. त्याअर्थी ती स्वेच्छेने कुठे तरी गेली असावीत असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला असला तरी त्यांना पळवून नेले असावे की काय ही शक्यताही पोलीस आपल्या तपासात पडताळून पाहत आहेत.
(वार्ताहर)