Join us

एलटीटी ते करमाळी चार विशेष एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 05:09 IST

मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी यादरम्यान चार विशेष एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत.

मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी यादरम्यान चार विशेष एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. १७, १९, २४, २६ जानेवारी रोजी या साप्ताहिक विशेष फेऱ्या चालविण्यात येतील. गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १७ आणि २४ जानेवारी रोजी सायंकाळी ८.४५ वाजता एलटीटीहून सुटेल. ही एक्स्प्रेस करमाळी येथे सकाळी ९ वाजता पोहोचेल. साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १९ आणि २६ जानेवारी रोजी सकाळी ८.२० वाजता करमळीहून सुटेल. ही एक्स्प्रेस एलटीटीला रात्री १२.१० वाजता पोहोचेल. या एक्स्प्रेसला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिवि येथे थांबा दिला जाणार आहे.