चारकोपमध्ये तीन बलात्कार प्रकरणांत चौघांना अटक

By Admin | Updated: November 30, 2014 23:41 IST2014-11-30T23:41:13+5:302014-11-30T23:41:13+5:30

दुसरी घटनाही चारकोपमध्येच घडली असून, या प्रकरणात पंधरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच आईच्या प्रियकराने बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

Four people arrested in Charkop in three rape cases | चारकोपमध्ये तीन बलात्कार प्रकरणांत चौघांना अटक

चारकोपमध्ये तीन बलात्कार प्रकरणांत चौघांना अटक



मुंबई : चारकोप येथे तीन बलात्कारांच्या प्रकरणांमध्ये चारकोप पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
चारकोपमधील भाबरेकर नगरात पाच वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या चौदा वर्षांच्या मुलासह त्याच्या बारा वर्षांच्या मित्राने बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित मुलगी दुपारच्या वेळी घराबाहेर खेळत असताना चौदा वर्षांच्या मुलाने तिला आपल्या घरात नेले. तेथे बारा वर्षाचा मित्र आधीपासून होता. त्या दोघांनी पीडित मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केले. मुलगी घरी आली असता रडू लागली. आईने विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने तक्रार नोंदविल्यावर चारकोप पोलिसांनी त्या दोघांना अटक केली.
दुसरी घटनाही चारकोपमध्येच घडली असून, या प्रकरणात पंधरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच आईच्या प्रियकराने बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली. तिने हा प्रकार आपल्या विवाहित बहिणीला सांगितला असता त्या दोघींनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी त्याला अटक केली.
तिसरे प्रकरणही चारकोपमध्येच घडले असून, या प्रकरणातील तरुण-तरुणी एकमेकांना वर्षभरापासून ओळखत होते. २६ वर्षांच्या तरुणाने २४ वर्षांच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून २०१३ सालापासून गोराई परिसरात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र तरुणीने लग्नाची मागणी केली असता तो तिला टाळू लागला. यावर तिने चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार केली. (प्रतिनिधी)

 

Web Title: Four people arrested in Charkop in three rape cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.