चारकोपमध्ये तीन बलात्कार प्रकरणांत चौघांना अटक
By Admin | Updated: November 30, 2014 00:59 IST2014-11-30T00:59:38+5:302014-11-30T00:59:38+5:30
चारकोप येथे तीन बलात्कारांच्या प्रकरणांमध्ये चारकोप पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

चारकोपमध्ये तीन बलात्कार प्रकरणांत चौघांना अटक
मुंबई : चारकोप येथे तीन बलात्कारांच्या प्रकरणांमध्ये चारकोप पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
चारकोपमधील भाबरेकर नगरात पाच वर्षाच्या मुलीवर शेजारी राहणा:या चौदा वर्षाच्या मुलासह त्याच्या बारा वर्षाच्या मित्रने बलात्कार केल्याची घटना घडली. पीडित मुलगी दुपारच्या वेळी घराबाहेर खेळत असताना चौदा वर्षाच्या मुलाने तिला आपल्या घरात नेले. तेथे बारा वर्षाचा मित्र आधीपासून होता. त्या दोघांनी पीडित मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केले. मुलगी घरी आली असता रडू लागली. आईने विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने तक्रार नोंदविल्यावर चारकोप पोलिसांनी त्या दोघांना अटक केली.
दुसरी घटनाही चारकोपमध्येच घडली असून, या प्रकरणात पंधरा वर्षाच्या मुलीवर तिच्याच आईच्या प्रियकराने बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली. तिने हा प्रकार आपल्या विवाहित बहिणीला सांगितला असता त्या दोघींनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी त्याला अटक केली.
तिसरे प्रकरणही चारकोपमध्येच घडले असून, या प्रकरणातील तरुण-तरुणी एकमेकांना वर्षभरापासून ओळखत होते. 26 वर्षाच्या तरुणाने 24 वर्षाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून 2क्13 सालापासून गोराई परिसरात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र तरुणीने लग्नाची मागणी केली असता तो तिला टाळू लागला. यावर तिने चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार केली. (प्रतिनिधी)