पाणी योजनेत चार लाखांचा अपहार

By Admin | Updated: September 10, 2014 23:35 IST2014-09-10T23:35:49+5:302014-09-10T23:35:49+5:30

लेखी नोटीस देवूनही रक्कम जमा न करता शासनाची फसवणूक करुन आर्थिक अपहार केल्या प्रकरणी नागोठणे पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Four million rupees in the water scheme | पाणी योजनेत चार लाखांचा अपहार

पाणी योजनेत चार लाखांचा अपहार

अलिबाग :पाण्याच्या झऱ्यांवर आधारित लघु नळपाणी पुरवठा अंतर्गत नळ योजना राबविण्यासाठी शिवकालीन पाणी साठवण योजना रायगड जिल्हा समितीने नागोठण्या जवळच्या चोळेटेप-शिहू ग्रामपाणी व स्वच्छता समिती अध्यक्ष व सचिव यांच्या नावे धनादेश दिला होता.
या ३ लाख ९० हजार ७२७ रुपयांचा विनियोग न करता, ठरवून दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केले नाही. परिणामी ही रक्कम शासनजमा करण्याबाबत लेखी नोटीस देवूनही रक्कम जमा न करता शासनाची फसवणूक करुन आर्थिक अपहार केल्या प्रकरणी नागोठणे पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या सात जणांमध्ये चोळेटेप-शिहू ग्रामपाणी व स्वच्छता समिती अध्यक्ष प्रवीण दामोदर कुथे व सचिव गीता अमृत कुथे यांच्यासह समिती सदस्य पुष्पा घनशाम कुथे, निर्मला निवृत्ती कु थे,चंद्रभागा कृष्णा कुथे, मोहन देवजी म्हात्रे, राजेंद्र नथुराम म्हात्रे सर्व शिहू यांचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Four million rupees in the water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.