Join us  

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 11:15 PM

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील कॅफे जनता रेस्टॉरंटसमोर हा भीषण अपघात झाला

मुंबई - मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात एका भीषण अपघात झाला असून, या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. क्रॉफर्ड मार्केट परिसरातील कॅफे जनता रेस्टॉरंटसमोर हा अपघात घडला.  या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. अन्य चार जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 पायधुनी पोलिसांकड़ून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. भरधाव वेगात निघालेल्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार क्रॉफर्ड मार्केट येथील जनता कॅफेला धडकली.  या अपघातात गंभीर जखमींना जेजे रुग्णालयात नेण्यात आले. तिथे चार जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. नईम, सरोजा, जुबेदा आणि एक अनोळखी महिला अशा चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला. तर मोहम्मद जुही, नदिम अन्सारी, कमलेश आणि मोहम्मद नदीम हे चार जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. 

टॅग्स :अपघातमुंबई