वीस मिनिटांत सोनसाखळी चोरीच्या चार घटना

By Admin | Updated: June 21, 2014 22:41 IST2014-06-21T22:41:57+5:302014-06-21T22:41:57+5:30

अवघ्या वीस मिनिटांत दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी धूम स्टाईलने चार महिलांच्या गळ्यातील सुमारे साडे सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने खेचून पोबारा केला.

Four incidents of gold robbery stolen in 20 minutes | वीस मिनिटांत सोनसाखळी चोरीच्या चार घटना

वीस मिनिटांत सोनसाखळी चोरीच्या चार घटना

>ठाणो : शहरातील राबोडी आणि नौपाडा परिसरात अवघ्या वीस मिनिटांत दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी धूम स्टाईलने चार महिलांच्या गळ्यातील सुमारे साडे सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने खेचून पोबारा केला. कोलबाड परिसरातील शोभा साळुंखे या पायी जाताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, चेन चोरीला गेली. ही घटना सकाळी 7 वाजता घडली. तर काही वेळातच राबोडीतील सुजाता वैती यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेण्यात आले. त्यानंतर  पुढील 1क् मिनिटांतच संगीता मुढके यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून चोरटय़ांनी पोबारा केला. या तिन्ही घटनांप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पाचपाखाडीतील विजया चित्रवार यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेले. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या चार घटनांत एकूण 1 लाख 45 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Four incidents of gold robbery stolen in 20 minutes