Join us  

UPSC मध्ये महाराष्ट्रातील चौघे पहिल्या शंभरमध्ये; यशस्वी उमेदवारांमध्ये कोण किती? वाचा सर्वकाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 8:32 AM

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) मंगळवारी २०२३ च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली/मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) मंगळवारी २०२३ च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यात उत्तर प्रदेशच्या आदित्य श्रीवास्तवने देशात पहिला क्रमांक पटकावला. अनिमेष प्रधान आणि डोनुरू अनन्या रेड्डी यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. महाराष्ट्रातून कुश मोटवानी (११वा), समीर खोडे (४२ वा), नेहा राजपूत (५१ वी), अनिकेत हिरडे (८१ वा) यांनी पहिल्या शंभरात येण्याची कामगिरी केली आहे.

आयआयटी कानपूरमधून इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात काही काळ नोकरी आदित्यने यूपीएससीचा निर्णय घेतला. २०२२ मध्ये यूपीएससीत २३६ वी रँक मिळवित आदित्य आयपीएस झाला होता. प्रशिक्षणासोबत आयएएसची तयारीही सुरू ठेवली होती. अनिमेश प्रधान मूळचा ओडिशाचा आहे. त्याने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून, तर अनन्या रेड्डी हिने दिल्लीतील मिरांडा हाउस येथून भूगोल या विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

एकूण उमेदवार - १०१६पुरूष उमेदवार - ६६४महिला उमेदवार - ३५२

यूपीएससी यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो. या उमेदवारांना मेहनत, चिकाटी आणि समर्पणाचे फळ मिळाले आहे. सार्वजनिक सेवेतील एक आशादायक कारकीर्दीची सुरुवात झाली आहे. त्यांचे प्रयत्न आपल्या देशाचे भविष्य घडवतील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

यशस्वी उमेदवारांमध्ये कोण किती? 

  • दिव्यांग उमेदवार     - ३० 
  • खुल्या गटातील उमेदवार -    ३४७ 
  • ईबीसी उमेदवार -    ११६ 
  • ओबीसी उमेदवार -    ३०३ 
  • एससी उमेदवार -    १६५ 
  • एसटी उमेदवार -    ८६ 

यशस्वी उमेदवारांतून कोणती पदे भरणार? 

  • आयएएस    - १८० 
  • आयएफएस - ३७ 
  • आयपीएस -    २०० 
  • गट अ - ६१३ 
  • गट ब - ११३ 
टॅग्स :केंद्रीय लोकसेवा आयोगमहाराष्ट्र