मनसेनापती कल्याण-डोंबिवलीत चार दिवस!

By Admin | Updated: October 29, 2014 22:24 IST2014-10-29T22:24:48+5:302014-10-29T22:24:48+5:30

नगरपरिषदा तसेच जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये पक्षाचा फियास्को होऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रभर तब्बल 3क्क् ठिकाणी झंझावाती दौरा करणार आहेत.

Four days for the MNS leader Kalyan-Dombivali! | मनसेनापती कल्याण-डोंबिवलीत चार दिवस!

मनसेनापती कल्याण-डोंबिवलीत चार दिवस!

अनिकेत घमंडी- डोंबिवली
लोकसभेसह विधानसभा निवडणूकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर आगामी वर्षभरात होऊ घातलेल्या महापालिका-नगरपरिषदा तसेच जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये पक्षाचा फियास्को होऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रभर तब्बल 3क्क् ठिकाणी झंझावाती दौरा करणार आहेत. त्या दौ-यांचा शुभारंभ ज्या ठिकाणाहून एकेकाळी भरघोस यश मिळाले होते, त्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रतून करणार आहेत. 3 ते 6 नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत हा दौरा या ठिकाणी केला जाणार आहे.
पक्षाचे कल्याण लोकसभा अध्यक्ष राजू पाटील यांनी याबाबतची माहिती ‘लोकमत’ला दिली. या चार दिवसांमध्ये 3 नोव्हे. - डोंबिवली पश्चिम, 4 नोव्हें.-कल्याण पश्चिम, 5 नोव्हे.- कल्याण पूर्व, आणि 6 नोव्हे.- डोंबिवली पूर्व अशा पद्धतीने ते दौरा करणार असल्याचे सांगण्यात आले. आवश्यकतेनूसार या योजनेत बदल होतील, मात्र या ठिकाणचा त्यांचा दौरा निश्चित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दरम्यान ते  नगरसेवकांसह कार्यकत्र्याच्या कुरबूरी-तक्रारी एकून घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणो आवश्यक ते तातडीचे बदल करुन जर कोणी चालढकलपणा करत असेल तर त्यास समजही दिली जाणार असल्याचे सूत्रंनी सांगितले. त्याचप्रमाणो समाजातील सन्माननीय व्यक्तिंच्या गाठीभेटीही या निमित्ताने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्या सर्वाकडून मनसे नगरसेवक-कार्यकत्र्यांसह पक्षाबद्दल त्यांना काय वाटते ते जाणून घेतले जाणार आहे.
 
पक्षगळती 
थांबवण्यासाठी दौरा ? 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राजू पाटील यांचा तर विधानसभा निवडणूकीत रमेश पाटील, हरिश्चंद्र पाटील, आणि प्रकाश भोईर या सर्वाचा दारुण पराभव झाला आहे. त्यातच सध्या महापालिका क्षेत्रत पक्षाला प्रचंड गळती लागण्याची शक्यता लक्षात घेऊन हा दौरा केला जात आहे का? यासह  त्यातच पक्षाचेच माजी आमदार काही नगरसेवकांसह पक्ष सोडण्याच्या वाटेवर असल्याची कुणकूण लागल्यानेच हा दौरा हात आहे का याबाबतच्या चर्चेने पक्षातच तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.
 
1 नोव्हेंबर रोजी मनसेचे 
‘चलो कृष्णकुंज’ 
मनसेला मरगळ आली आहे, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होत आहे, मात्र निवडणुका होतच असतात, त्यात यश-अपयश हे देखिल अपेक्षितच असते, मात्र त्यामुळे सामाजिक बांधिलकीसह आपुलकी, समाजकार्य संपुष्टात येत नसते. ते कार्य चिरंतन सुरुच असते हे दाखवून देण्यासाठी पक्षाच्या डोंबिवली शाखेने महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी-कार्यकत्र्याना 1 नोव्हेंबर रोजी ‘चलो कृष्णकुंज’ची हाक दिली आहे. त्यासाठी सर्वानी आवजरून यावे असे आवाहन पाटील यांच्यासह शहरअध्यक्ष राजेश कदम यांनी दिले आहे.
 
कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेला नाशिक खालोखाल यश मिळाले होते, 2क्1क् मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये या पक्षाच्या तब्बल 28 नगरसेवकांना यश मिळाले होते. त्यामुळेच या पक्षाची महापालिकेतील महत्वाचा घटक पक्ष अशी ख्याती झाली होती. त्यामुळे राज यांचे या महापालिकेसह येथिल नागरिकांवर विशेष प्रेम असून या ठिकाणाहूनच झंझावाती दौ-याचा शूभारंभ करणार असल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.

 

Web Title: Four days for the MNS leader Kalyan-Dombivali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.