लसीकरण प्रकरणी चार दिवसांची कोठडी
By Admin | Updated: December 16, 2014 22:35 IST2014-12-16T22:35:43+5:302014-12-16T22:35:43+5:30
हिपॅटायटीज बी, स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसी अत्यल्प दरात देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे उकळणा-या टोळीला शहर पोलिसांनी अटक

लसीकरण प्रकरणी चार दिवसांची कोठडी
महाड : हिपॅटायटीज बी, स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसी अत्यल्प दरात देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे उकळणा-या टोळीला शहर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना चार दिवस पोलीस कोठडी दिली. बेकायदा औषधे दिल्याबाबत सोमवारी अटक केलेल्या किरण बेर्डे, कल्पेश सावंत, अरुण महाजन, दीपक शिर्के, श्रीकांत तांबे, प्रतीक सावंत या सहा जणांविरुध्द कारवाई केली. पो. उपनिरीक्षक मलिक तपास करीत आहेत.