ठाण्याच्या चारही मतदारसंघांत इस्कोट
By Admin | Updated: September 28, 2014 00:50 IST2014-09-28T00:50:14+5:302014-09-28T00:50:14+5:30
अखेर महायुती आणि आघाडी तुटल्याने त्याचे दूरगामी परिणाम ठाणो शहरातील राजकारणात होण्याची शक्यता आहे. अंतिम लढाईसाठी सर्व पक्ष तयार झाले आहेत़

ठाण्याच्या चारही मतदारसंघांत इस्कोट
>अजित मांडके - ठाणो
अखेर महायुती आणि आघाडी तुटल्याने त्याचे दूरगामी परिणाम ठाणो शहरातील राजकारणात होण्याची शक्यता आहे. अंतिम लढाईसाठी सर्व पक्ष तयार झाले आहेत़ किंबहुना, आता ख:या अर्थाने रणधुमाळीचा आखाडा रंगला आहे. ठाण्यातील विधानसभेच्या चारही जागांवर पंचरंगी लढती होणार आहेत.
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना हादरा बसला आहे. तिकीट नाकारल्याने उपनेते अनंत तरे यांनी थेट त्यांच्याविरोधात भाजपातून अर्ज भरल्याने येथे शिंदेंना घरभेदीच्या आव्हानाला सामोरे जाण्याची वेळ आली. कळवा-मुंब्रा मतदारसंघात आव्हाडांना सर्वपक्षीय चक्रव्यूहाचा सामना करावा लागणार आहे.
ठाणो शहर विधानसभा मतदारसंघात आता परिस्थिती बदलल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला मागच्या वेळी एवढीच मते मिळतील का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यातच, भाजपाने येथे संजय केळकर यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे युतीची पारंपरिक मते येथून विभागली जाणार आहेत. त्यातच सेनेने अखेरच्या क्षणी रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिल्याने येथील निष्ठावान शिवसैनिक नाराज झाले. या ठिकाणी इच्छुक असलेले गोपाळ लांडगे यांना कल्याण पूव्रेतून उमेदवारी देऊन त्यांचे बंड थोपविण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला आहे. तसेच काँग्रेसने नारायण पवार आणि राष्ट्रवादीकडून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आघाडीच्या मतांत मोठय़ा प्रमाणात फूट पडण्याची चिन्हे आहेत. मनसेच्या वतीने नीलेश चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येथे पंचरंगी लढत होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मागील निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे 33 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. यंदाही या मतदारसंघातून सेनेकडून एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या वतीने संदीप लेले यांनी अर्ज दाखल केला आहे. परंतु, काँग्रेसच्या वतीने मनोज शिंदे यांचे नाव जाहीर झाले असताना त्यांच्या नावाला विरोध झाल्याने त्यांच्या जागी मोहन तिवारी यांना ही लॉटरी लागली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने डॉ. बिपिन महाले रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, महायुती तुटली असली तरी शिंदे यांच्यासमोर लेले यांचे साधे आव्हान वाटत होते. परंतु, ठाणो विधानसभेतून डावलल्याने शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी भाजपामधून कोपरी-पाचपाखाडी मतदरासंघातून शिंदे यांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे शिंदे यांना घरच्यांचे कडवे आव्हान उभे राहिले आहे. त्यात आता तरे यांच्या उमेदवारीमुळे लेले यांना मात्र उमेदवारी मागे घेण्याची वेळ आली आहे.
ओवळा-माजिवडा मतदारसंघात मराठी आणि गुजराती या दोन भाषिक मतदारांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. मागील निवडणुकीत येथून शिवसेनेचे प्रताप सरनाईक 9 हजार 41 मतांनी विजयी झाले होते. त्या वेळी मनसेच्या सुधाकर चव्हाण यांना 43 हजार 332 मते मिळाली होती. काँग्रेसचे दिलीप देहरकर थेट तिस:या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यांना केवळ 34 हजार 18 मते मिळाली होती. यंदा या मतदारसंघातून शिवसेनेकडून पुन्हा प्रताप सरनाईक हेच रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसकडून मीरा-भाईंदरच्या नेत्या प्रभात पाटील तर राष्ट्रवादीकडून ठाणो महापालिकेचे विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजपाने महापालिकेतील अपक्ष नगरसेवक संजय पांडे यांना संधी दिली आहे. मनसेकडून सुधाकर चव्हाण हेच या खेपेलाही पुन्हा आपले नशीब अजमावत आहेत. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि भाजपा असा पंचरंगी सामना येथे रंगणार आहे.
आव्हाड अडकले सर्वपक्षीयांच्या चक्रव्यूहात
च्2क्क्9 सालच्या निवडणुकीत कळवा-मुंब्रा येथून आघाडीचे अर्थात राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड विजयी झाले होते. त्या वेळी मनसेच्या प्रशांत पवार या नवख्या उमेदवाराला तब्बल 15 हजार 121 मते मिळाली होती. परंतु, मतविभाजनाचा फायदा आव्हाडांना मिळाल्याने शिवसेनेच्या राजन किणो यांचा पराभव झाला होता.
च्या निवडणुकीत शिवसेनेने दशरथ पाटील यांना उमेदवारी दिली. भाजपाकडून अशोक भोईर यांनी अर्ज भरला आहे. भोईर यांचा 2क्12 मध्ये पालिका निवडणुकीत पराभव झाला होता. राष्ट्रवादीतून पुन्हा जितेंद्र आव्हाड रिंगणात आहेत.
च्काँग्रेसकडून येथे मुंब्य्रातील नगरसेवक यासीन कुरेशी यांना उमेदवारी दिल्याने आघाडीला एकगठ्ठा मिळणा:या मतांचे विभाजन होऊन त्याचा फटका आव्हांना बसणार आहेच. एमआयएमने अशरफ मुलाणी आणि सपाने सिकंदर खान मैदानात उतरल्याने आव्हाड सर्वपक्षीयांच्या चक्रव्यूहात अडकल्याचे दिसत आहे.