चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

By Admin | Updated: December 17, 2014 23:45 IST2014-12-17T23:45:21+5:302014-12-17T23:45:21+5:30

चार सनदी अधिका-याच्या राज्य शासनाने आज बदल्या केल्या. कर्मचारी राज्य विमा योजनेच्या आयुक्त सीमा व्यास यांची बदली महिला

Four Chartered Officers Transfer | चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

नागपूर : चार सनदी अधिका-याच्या राज्य शासनाने आज बदल्या केल्या. कर्मचारी राज्य विमा योजनेच्या आयुक्त सीमा व्यास यांची बदली महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले जे.पी. गुप्ता यांना व्यास यांच्या जागी पाठविण्यात आले आहे. आधी अन्न व नागरी पुरवठा नियंत्रक म्हणून बदली करण्यात आलेले पी. वेलारसू यांना आता विक्रीकर विभागाचे सहआयुक्त म्हणून पाठविण्यात आले आहे. श्वेता सिंगल या नवीन अन्न व नागरी पुरवठा नियंत्रक असतील.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Four Chartered Officers Transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.