कांदिवलीत चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST2021-02-05T04:28:21+5:302021-02-05T04:28:21+5:30
मुंबई : कांदिवलीत एका मोबाइल दुकानात चोरीच्या उद्देशाने आलेल्या चौघांना समतानागर पोलिसांनी अटक केली आहे. लुटीसाठी आणलेले साहित्य जप्त ...

कांदिवलीत चौघांना अटक
मुंबई : कांदिवलीत एका मोबाइल दुकानात चोरीच्या उद्देशाने आलेल्या चौघांना समतानागर पोलिसांनी अटक केली आहे. लुटीसाठी आणलेले साहित्य जप्त करत त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
....
वृद्धेची फसवणूक
मुंबई : कर्जत येथे बांधकाम प्रकल्प उभारत असल्याचे भासवून ठगांनी कळवा येथे राहणाऱ्या ७३ वर्षीय वृद्धेकडून साडेतीन लाख रुपये घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दादर परिसरात पैशांचा व्यवहार झाल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करुन दादर पोलीस तपास करत आहेत.
....
सराफाला गंडा
मुंबई : ग्राहकाला दागिने दाखविण्याचा बहाणा करुन सोने व्यापाऱ्याकडून दागिने घेत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार झवेरी बाझारमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
....
पूर्ववैमनस्यातून हत्येचा प्रयत्न
मुंबई : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून ट्रॉम्बे येथील चित्ता कॅम्प परिसरात शबाना खान यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यात चाकूने त्यांच्यावर हल्ला चढविण्यात आला आहे. यात त्यांचा मुलगाही जखमी झाला आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे