Join us  

राज्यात चार महिन्यांमध्ये साडेचार हजार जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 5:15 AM

राज्यातील द्रुतगती मार्गांवर एकूण १२४ अपघात झाले. यामध्ये २७ अपघातांमध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला, तर १८ अपघातांत ४७ जण गंभीर जखमी झाले.

मुंबई : राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वाहनांबरोबरच रस्ते अपघातांच्या घटना वाढत आहेत. जानेवारी ते एप्रिल २०१९ या चार महिन्यांमध्ये ११ हजार ८७० अपघात झाले असून या अपघातांत ४५२० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.राज्यातील द्रुतगती मार्गांवर एकूण १२४ अपघात झाले. यामध्ये २७ अपघातांमध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला, तर १८ अपघातांत ४७ जण गंभीर जखमी झाले. याच कालावधीत झालेल्या १० अपघातांमध्ये ८ जण किरकोळ जखमी झाले तर ६९ अपघातांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवर चार महिन्यांत २८२५ अपघात झाले. यात १,११६ अपघातांत १,२२२ जणांचा मृत्यू झाला, तर८९८ अपघातांमध्ये १,६२५ जणगंभीर जखमी झाले. याच कालावधीत ४३३ अपघातांमध्ये ९०० जण किरकोळ जखमी झाले तर ३७८ अपघातांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.राज्य महामार्गांवर एकूण २,६२६ अपघात झाले असून यातील १,०७४ अपघातांत १,१९१ जणांना जीवाला मुकावे लागले. तर ८४२ अपघातांमध्ये १,५४२ जण गंभीर जखमी झाले. तसेच ४०९ अपघातांत ८२८ जण किरकोळ जखमी झाले असून ३०१ अपघातांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.राज्यातील इतर रस्त्यांवर अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. चार महिन्यांत एकूण ६,२९५ अपघात झाले. त्यातील १,९४६ अपघात जीवघेणे होते.या अपघातांमध्ये २०७३ जणांचा मृत्यू झाला. तर २,४८० अपघतांमध्ये ३,४८९ जण गंभीर जखमी झाले. तसेच १,१५२ अपघातांमध्ये १८७७ जण किरकोळ जखमी झाले असून ७१७ अपघातांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.वेगाचे बळीवाढते अपघात आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. राज्यात २०१७ मध्ये ११ हजार ४५४ तर २०१८ मध्ये १२ हजार ४९८ अपघाती मृत्यू झाले होते.

टॅग्स :अपघात