‘फ’ कार्यालयांतर्गत साडेचौदा लाख कार्डधारक
By Admin | Updated: December 29, 2014 22:56 IST2014-12-29T22:56:13+5:302014-12-29T22:56:13+5:30
ठाणे शिधावाटप कार्यालयाच्या ‘फ’ परिमंडळ कार्यक्षेत्रात तब्बल १४ लाख ४९ हजार ११६ रेशनकार्डधारक असून यामध्ये ठाणे ३६ फ आणि ४१ फ मध्ये एकूण ३ लाख ७० हजार ३७० इतके कार्डधारकआहेत.

‘फ’ कार्यालयांतर्गत साडेचौदा लाख कार्डधारक
पंकज रोडेकर - ठाणे
ठाणे शिधावाटप कार्यालयाच्या ‘फ’ परिमंडळ कार्यक्षेत्रात तब्बल १४ लाख ४९ हजार ११६ रेशनकार्डधारक असून यामध्ये ठाणे ३६ फ आणि ४१ फ मध्ये एकूण ३ लाख ७० हजार ३७० इतके कार्डधारकआहेत. २ लाख ७६ हजार ९२५ हे शुभ्र कार्डधारक असून ११लाख २७ हजार ८७९ हे केशरी कार्डधारक आहेत. मात्र, लाभार्थी कार्डधारकांची संख्या २० हजार ५१७ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘फ’ या परिमंडळात ठाणे, कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, नवी मुंबई या महानगरपालिकांसह कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिके तील कार्यक्षेत्रांचा समावेश आहे. या कार्यक्षेत्रांसाठी १३ उपशिधावाटप कार्यालये कार्यरतआहेत. त्याअंतर्गत नोव्हेंबर २०१४ अखेरपर्यंत एकूण १४ लाख ४९ हजार ११६ जणांना रेशनकार्डवाटप केले आहे. ६ हजार ९२७ अंत्योदय आणि ३ हजार ५०७ अन्नपूर्णा कार्डधारकांची नोंद आहे. तर १ हजार १५० बंद गिरणी कामगार कार्डधारक आहेत. या कुटुंबीयांसह असंघटित, तात्पुरते, बेघर आणि निराधार महिला असेही वर्गीकरण करण्यात आले असून २ हजार ६४२ असंघटित, ३ हजार ८९ तात्पुरते, १ हजार ५७० बेघर आणि २८८ निराधार महिला असे कार्डधारक आहेत.
शुभ्र कार्डधारकांपेक्षा केशरी कार्डधारकांची संख्या अधिक आहे. ६० वर्षांवरील निराधारांसाठी अन्नपूर्णा योजनेंतर्गत प्रति माणसास प्रत्येकी ५ किलो गहू आणि तांदूळ मिळतो. अन्नपूर्णा गटात ३ हजार ५०७ रेशनकार्डधारक असून यामध्ये सर्वाधिक भिवंडी कार्यालयात १ हजार ३५७ कार्डधारक आहेत. त्यापाठोपाठ भाईंदर ३९५ आणि ठाणे ३४९ कार्र्डधारक आहेत. सर्वात कमी कार्डधारक ३८ हे डोंबिवलीत आहेत.
शासन नियमानुसार वर्गीकरण केलेल्या कार्डधारकांमध्ये ठाण्यात सर्वाधिक २ लाख ६हजार ९७८ इतकी नोंद असून त्यापाठोपाठ कल्याणात १ लाख ६३ हजार ९५४ कार्डधारक आहेत. सर्वात कमी कार्डधारकांची संख्या बदलापूर कार्यालयात ३८ हजार ३०१ इतकी नोंदवण्यात आली आहे.
शुभ्र कार्डधारकांमध्ये सर्वाधिक वाशी येथील कार्यालयात ४५ हजार ११४ नोंद असून त्यापाठोपाठ ठाण्यात ४१ हजार ५१४, कल्याण ३८ हजार २७१ कार्डधारक आहेत. सर्वात कमी शुभ्र कार्डधारक भिवंडीत ३ हजार ९१ इतके आहेत. तसेच केशरी कार्डधारकांमध्ये सर्वाधिक कार्डधारकांची नोंद ठाण्यात १लाख ६२ हजार ९२३ इतकी आहे.त्यापाठोपाठ भिवंडीत १ लाख ४५ हजार २८० इतकी असून सर्वात कमी बदलापुरात २१ हजार ८१० इतकी नोंद आहे.