Join us  

राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 9:12 AM

मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात नीला सत्यनारायण यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.

मुंबई - राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे आज निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.  राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.

नीला सत्यनारायण यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९४९ रोजी झाला होता. १९७२ च्या बॅचच्या सनदी अधिकारी (निवृत्त) असलेल्या नीला सत्यनारायण यांनी प्रशासनातील विविध पदांवर काम केले होते. त्या राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त ठरल्या होत्या.

सत्यनारायण यांनी प्रशासकीय सेवेसोबतच साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटवला होता. त्यांनी सुमारे १५० कविताचे लेखन केले होते. तसेच काही मराठी आणि हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले होते. त्यांच्या एका कथेवर आधारलेला बाबांची शाळा हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

'सोनेरी' हॉटेल; दारं-खिडक्याच काय, टॉयलेटसुद्धा सोन्याचं! अशा आहेत सुख-सुविधा...

टॅग्स :महाराष्ट्रभारतीय निवडणूक आयोग